अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी मंद्रुप पोलिसांच्या ताब्यात ; मंद्रुप पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी... - दैनिक शिवस्वराज्य

अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी मंद्रुप पोलिसांच्या ताब्यात ; मंद्रुप पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी...

   
 समीर शेख प्रतिनिधी           
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार यांना पोलीस ठाणेकडील अभिलेखावरील पाहीजे आरोपी पकडणे बाबत आदेश दिला होता.
       दि. 08 मार्च 2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांना मंद्रुप पोलीस ठाणे गु.र.नं. 284/2021 भादवि कलम 365,323, 504, 506, 34, प्रमाणे दाखल गुन्हयातील दोन वर्षापासून पाहीजे असलेला आरोपी दशरथ भिमु बिराजदार वय 24 रा. पांडोझरी ता. जत जि. सांगली हा रात्रीच गावामध्ये आल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदरची माहिती मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना दिली. त्यांनी तात्काळ सदर आरोपीस ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने पांडोझरी ता. जत. जि. सांगली येथे जावुन उमदी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्या मदतीने सदर आरोपीस साफळा लावून ताब्यात घेतले. सदरची कामगिरी अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापुर ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे प्रभारी अधिकारी मंद्रूप पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार यांनी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads