महाराष्ट्र
मा.बाबासाहेब पाटील यांचा 81वा वाढदिवस साजरा
सलीम शेख प्रतिनिधी.
मंगळवेढा :- बोराळे गावचे सुपुत्र मंगळवेढा पंचायत समिती चे माजी सभापती, नूतन हायस्कूल बोराळे चे अध्यक्ष व विद्याविकास मंडळाचे उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठ्ठलराव पाटील यांचा बोराळे ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, अर्बन बॅंकेचे चेअरमन राहुल शहा,सचिव किसन गवळी, प्राचार्य एन.बी.पवार,कारखान्याचे संचालक दयानंद सोनगे, संतोष सोनगे, रमेश भांजे, जालिंदर व्हनुटगी, दिलीपकुमार धनवे, शिवाप्पा कवचाळे, या मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिवानंद पाटील ,राहुल शहा, प्राचार्य एन.बी.पवार, राजकुमार बनसोडे,जयश्री कवचाळे ,अर्पिता लाड,प्रहारचे संघटनेचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी बाबासाहेब पाटील यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याचे कौतुक करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांच्या प्रास्ताविकात संजीव कवचाळे यांनी बाबासाहेब पाटील यांच्या जीवनकार्य आपल्या अस्खलित वाणीतून केला. पाटील कुटुंबीयांकडून बाबासाहेब पाटील यांना औक्षण करून केक कापून वाढदिवस साजरा केला. सत्कारास उत्तर देताना बाबासाहेब पाटील म्हणाले की आजपर्यंत,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अतिशय प्रामाणिक व निस्वार्थपणे कार्य केल्याचे समाधान होत आहे. सत्काराबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमांस मारूती चौगुले, कल्लाप्पा पाटील, सरपंच सुजाता पाटील, मल्लिकार्जून भांजे, ,रविंद्र वाघमारे, नानासाहेब कपले, बसवंत बिराजदार,नूतन हायस्कूल बोराळे, मातुर्लिंग हायस्कूल सिध्दापूर व संत दामाजी महाविद्यालयाचे सर्व स्टाफ व बोराळे, अरळी,सिध्दापूर पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा