महाराष्ट्र
सागर सिमेंट च्या वतीने वितरकांना दुबई चा विदेश दौरा....
समीर शेख प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सिमेंट क्षेत्रात अल्पावधीत नावाजलेल्या सागर सिमेंट लिमिटेड यांच्या वतीने महाराष्ट्रातील सागर सिमेंटच्या वितरकांना कंपनीच्या वतीने १४ मार्च ते १९ मार्च रोजी दुबई येथे विदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ मार्च २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून सर्व वितरक आणि सागर सिमेंटचे अधिकारी दुबई ला रवाना झाले.
आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या वितरक व अधिकाऱ्यांसाठी या विदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
"महाराष्ट्रात आज सागर सिमेंटचा चढता आलेख पाहता येथील अनेक युवा उद्योजकांना सक्षम करण्याचे मला भाग्य लाभले, सागर सिमेंट चे नेटवर्क महाराष्ट्रात वाढवून महाराष्ट्र हेड म्हणून काम केल्याचे समाधान नक्कीच आहे.
यातून ट्रांसपोर्ट व्यवसायाला देखील चालना मिळाली, अनेकांना रोजगार भेटला, कौटुंबिक स्थैर्य लाभले आणि त्यांनी देखील बर्याच हाताला काम दिले" असे भावना सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक श्री महादेव कोगानुरे यांनी व्यक्त केले व कंपनी व्यवस्थापन, कंपनी चे CMO राजेशसिंग साहेब व सर्व सिनीअर अधिकार्यांचे मनापासून आभार मानले.
व्यवसाय, स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनातून थोडा विश्राम मिळावा थोडा विरंगुळा व्हावा यासाठी सागर सिमेंट कंपनीकडुन वितरकांना ही भेट दिल्याने सर्व वितरक देखील आनंदी व समाधानी आहेत. अनेकजण सामान्य कुटुंबातील असुन त्यांना मिळालेली ही संधी कंपनीमुळे मिळाली यात ते धन्यता मानतात.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा