आशा दिवस व महिला दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
आरोग्य विभाग जामनेर तालुका व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह जामनेर येथे आशा दिन व जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर नगरी च्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे,
कृषि अधिकारी अभिनय चोपडे,अतिरिक्त गटविकास अधिकारी राजु ढेपले,सरकारी वकील अनिल सारस्वत, वकील संघाचे बी.एम.चौधरी,एम.बी.पाटील,आय एम ए चे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, डॉक्टर्स असोसिएशनचे चे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर पाटील,निमा चे अध्यक्ष डॉ.नंदलाल पाटील,न.पा. गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,डॉ.अजय पाटील,डॉ.मनोज पाटील,डॉ.मनोज तेली,अर्चना किरोते, रुपाली पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रम प्रसंगी आशा स्वयंसेविका व बचत गटातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जामनेर तालुका वकील संघ यांच्यामार्फत दिवाणी व फौदारी न्यायालयाचे न्यायाधीश दि.न.चामले,बी.एम.काळे,पी.व्ही.
सुर्यवंशी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
आशा दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात आली तसेच आशा व गटप्रवर्तक यांनी वर्षभर केलेल्या कार्याचा गौरव पुरस्कार, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.तसेच आय.डी. ए. जळगांव कडून डॉ.आशिष महाजन यांचे मुखरोग व कर्करोग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णा दौड, अर्चना टोके, संगीता पाटील,रेखा तायडे,सुनीता पाटील,नीलिमा गवळी,माया बोरसे,सविता कुमावत, ज्योती पाटील,सुनयना चव्हाण, माधुरी पाटील,लता सुशिर,यमुना पाटील,रविंद्र सूर्यवंशी, राजू पवार,गोपाळ पाटील,भागवत वानखेडे,व्ही.एच.
माळी, सुनील पाटील,अनिल सोनवणे,प्रदीप पाटील,बशीर पिंजारी,आशा कुयटे, शिवाली देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा