पन्नास खोके एकदम ओके...... जामनेरात खोक्याची होळी
जामनेर शहरात भुसावळ रोड येथे महाविकास आघाडीच्या वतीने पन्नास खोक्याची होळी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने महागाई तसेच बेरोजगारीच्या विरोधात होळी करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या धोरणांवर संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस आदी वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांसह महिला, युवकांना महागाई व बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे, असे म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी भुसावळ रोड येथे होळी करण्यात आली. यावेळी खोक्याची होळी पेटवून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला .
पन्नास खोके एकदम ओके सोमवारी संध्याकाळी होळीच्या पवित्र अग्नीत दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष-विलास राजपूत, काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना तालुका अध्यक्ष ॲड -ज्ञानेश्वर बोरसे,ॲड-प्रकाश पाटील, किशोर पाटील,रा.कॉ.यु-तालुका अध्यक्ष-डॉ.प्रशांत पाटील,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,ॲड-राजेंद्र चोपडे, माधव चव्हाण, ॲड-राजू मोगरे,विनोद माळी, सोनुसिंग राठोड, संजय राठोड, संदीप पाटील, बंटी पाटील, ईश्वर पहेलवान,अमोल सोनवणे,विश्वजितराजे पाटील, जगन बोरसे,प्रभू झाल्टे,सचिन बोरसे,विकी सोनार, सौरभ अवचारे, राजू भाई, विशाल भोई, पवन माळी, मनोज मिश्री,संजय पाटील, इम्रान भाई, शहीद शेख, उस्मान भाई, विशाल लामखेडे,नाना पाटील,मुकेश पाटील,आदी महाविकास आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा