बहुजन शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध... अध्यक्षपदी बोधिप्रकाश गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी युवराज भोसले यांची निवड... - दैनिक शिवस्वराज्य

बहुजन शिक्षक पतसंस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध... अध्यक्षपदी बोधिप्रकाश गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी युवराज भोसले यांची निवड...



समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : येथील बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर सोलापूर यांच्यामार्फत नुकतीच पार पडली.
   यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्र.अ. बागल यांनी संचालकाच्या ११ जागांसाठी ११ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. पदाधिकारी निवडीची सभा निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यामध्ये नूतन अध्यक्षपदी प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, मानद सचिवपदी अण्णासाहेब भालशंकर, उपाध्यक्षपदी युवराज भोसले, खजिनदारपदी रवी देवकर यांची निवड झाली. यावेळी नूतन संचालक बाळासाहेब डोळसे, प्रफुल्ल जानराव, मिलिंद भालशंकर , प्रभावती भडकुंबे, मंजुश्री खंडागळे, कल्याणराव गजबार, प्रतिभा गायकवाड, हारूण तांबोळी हे उपस्थित होते. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व सभासदांची बैठक झाली. या बैठकीत बिनविरोधासाठी सभासदांना आवाहन करण्यात आले होते.
    यावेळी नूतन अध्यक्ष गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, निवडणुकीमुळे पतसंस्थेचा होणारा खर्च टाळण्यासाठी सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले.
    नूतन मानद सचिव भालशंकर यांनी पतसंस्थेने सर्वच स्तरावर विश्वास संपादन केला असून यापुढेही संचालक मंडळाच्या मदतीने पतसंस्था प्रगती साधेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मल्लिकार्जुन कांबळे, मीना सन्मुख, संघपाल कांबळे, प्रकाश शिंदे यांचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads