महाराष्ट्र
शिंगणापूर घाटातील वाहतुकीत बदल...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- हायब्रीड अॅन्युटी मॉडेल या योजनेअंतर्गत डाळज - कळस-नातेपुते-शिंगणापुर- दहिवडी-पुसेसावळी ते कराड रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शिंगणापुर घाटातील 500 मी लांबीचा रस्ता सुधारण्याचे काम पूर्ण करण्यासाठी दिनांक 24 जुलै ते 07 ऑगस्ट 2023 या कालावधीत शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असल्याबाबतचे जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
शिंगणापुर घाटातील लांबीत घाट फोडुन रस्ता रूंदीकरणासाठी घाट खोदाई करताना दगड, मुरूम रस्त्यावर येऊन येणाऱ्या-जाणा-या वाहनांना धोका होण्याची शक्यता आहे. घाटातील लांबीत रस्ता रूंदीकरणाचे काम पुर्ण होण्यास 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत या रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याने सदरच्या मार्गावरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग- नातेपुतेकडून शिंगणापुरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी नातेपुते- पिंपरी- कोथाळे - शिंगणापुर या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी. तसेच शिंगणापुरकडून - नातेपुतेकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी शिंगणापुर- कोथाळे- पिंपरी- नातेपुते या पर्यायी मार्गाने वाहतुक करावी
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा