सामरोद येथील युवकाची शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील तरुण शेतकऱ्याने शेतालगत असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार (दि.26) दुपारच्या सुमारास जामनेर तालुक्यातील सामरोद तळेगांव रस्त्या अंतर्गत येणाऱ्या शेतात येथे उघडकीस आली ज्ञानेश्वर अशोक वखरे (31वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर अशोक वखरे हे शेतात कोळपणी कामासाठी जातो असे सांगून बुधवारी सकाळी 10वाजेच्या सुमारास शेतात गेला. तो शेतीची कामे करीत होता.दरम्यान, तो शेतालगत असलेल्या झाडाला आंजनाच्य झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.त्याच्या वहिनी यांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जामनेर येथे आणले असता डॉक्टरांनी ज्ञानेश्वर अशोक वखरे मृत घोषित केले. ज्ञानेश्वर अशोक वखरे यांनी नेमकी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे. जामनेर पोलिस स्टेशन ला मृत्यू ची नोंद करण्यात आली
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा