महाराष्ट्र
Emergency Alert Message : चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज तुम्हालाही आला का?.... घाबरू नका?
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर दि.20: गुरुवारी सकाळी सकाळीच मोबाईल vibrate झाला, अचानक मोबाईलवर इंग्रजी भाषेत Emergency alert: Severe This is a test alert from Department of Telecommunication, Government of India. 20-07-2023.10:20 AM असा चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज अनेकांच्या मोबाईलवर आला. काय करावे कुणाला कळेना yes करावे की No करावे कळेना. परत काही वेळाने मराठी मध्ये Emergency alert: Severe हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. 20-07-2023. 10:31 AM हा मेसेज आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सूचित करण्यात यावे यासाठी याचे प्रात्यक्षिक या मेसेजद्वारे करण्यात आले आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमाने महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांच्याशी संवाद साधला असता, महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे बोलताना म्हणाले कि , “अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.” असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे ही संकल्पना नागरिकांच्या हितासाठीच अमलात आणण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा