जामनेर.. निमखेडी पिंपरी सरपंच पदी पल्लवी सतीश पाटील यांची बिनविरोध निवड
जामनेर तालुक्यातील निमखेडी पिंपरी ग्रामपंचायत येथे महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पल्लवी सतीश पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. सरपंच पल्लवी सतीश पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला. निवडणूक अधिकारी संजय तुकाराम जाधव यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी सरपंच पल्लवी पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच पल्लवी पाटील यांनी दिली आहे. त्यावेळी ग्रामपंचायत मधील पदाधिकारी ,सदस्य, ग्रामसेवक ,आणि ग्रामस्थ उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा