अंत्रोळी येथे “एक तास स्वच्छतेसाठी” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ; आमदार सुभाष देशमुख यांच्यासमवेत जेष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांनी केली स्वच्छता..... - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी येथे “एक तास स्वच्छतेसाठी” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ; आमदार सुभाष देशमुख यांच्यासमवेत जेष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांनी केली स्वच्छता.....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात दि. १ ऑक्टोबर रोजी 'एक तारीख एक तास' हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये सकाळी 10 वाजता एकाचवेळी श्रमदान मोहिम करण्यात आली. देशभरात एकाचवेळी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम असून शहर, नगरपरिषद, तसेच प्रत्येक गावांमध्ये सदरचा उपक्रम राबविण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे सर्व नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, युवकांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान दिल्याचे पाहायला मिळाले. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दि १ ऑक्टोबर रोजी सकाळी अंत्रोळी गावातील परिसराची साफ सफाई करण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः अंत्रोळी येथील हनुमान मंदिर परिसरात हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला. आमदार सुभाष देशमुख यांच्यासमवेत अंत्रोळीच्या संरपच माया ब्रम्हदेव सलगरे, मळसिद्ध मुंगळे, गजीनाथ शेजाळ,प्रगतशील बागायतदार झांबरे पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रथमता आमदार सुभाष देशमुख यांचा ग्रापंचायत अंत्रोळी व ग्रामस्थांकडून शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ देवून सत्कार व सन्मान करण्यात आला.
       व यावेळी आमदार सुभाष देशमुख यांना संरपच माया ब्रम्हदेव सलगरे यांनी विविध विकास कामांचे ३२ निवेदन देण्यात आले.
     अंत्रोळी गावात स्वच्छता अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचा परिसर, धार्मिकस्थळ आदी ठिकाणे मोहीम राबविण्यात आली. 
   या कार्यक्रमास मळसिद्ध मुंगळे, गजीनाथ शेजाळ, सरपंच माया ब्रम्हदेव सलगरे, उपसरपंच खरात, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बंडगर , इन्नूस शेख, नेताजी थोरात, कुंभकर्ण कांबळे, बापूसाहेब शेख,ग्रामसेवक फडतरे,कोतवाल बंसवंत सुतार,प्रगतशील बागायतदार झांबरे पाटील, रावसाहेब महिमकर, नानासाहेब करपे, चंद्रकांत कोकरे, आनंदा कर्वे, प्रकाश कोकरे, हरी सलगरे, समाधान शिंदे, हनुमंत कोळी, सरफराज शेख, मजीद शेख, बालाजी केंगार, उद्योगपती गणेश कुंभार, नबीलाल शेख, चंद्रकांत कोकरे,सद्दाम शेख, चिदानंद परीक्षाळे, विकी कांबळे, अविनाश कर्वे, सागर कर्वे, दयानंद कर्वे, भारत बंडगर, आमीन शेख, लक्ष्मण तांदळे, भाऊराव बेलदार, शहाजी भोसले, महिला बचत गटाच्या अध्यक्ष लक्ष्मी करपे, कल्पना सोनकवडे मॅडम तसेच महिला बचतगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, युवक मंडळे, विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदिंनी सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads