जामनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
जामनेर तालुक्यातील एकुलती भिलखेडा शिवारात बिबट्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विलास मधुकर पाटील असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पहूर येथील शुभम गोंधनखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार
भिलखेडा परिसरात शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवर थेट बिबट्याने झडप घातली. सुदैवाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठयाने आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विलास पाटील यांस प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या डोक्यावर, गालाला व घशाला मोठी दुखापत झाली आहे. दरम्यान, या घटनेने एकुलती गावांमध्ये भिलखेडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरे बसविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या बिबट्याने रात्री शेतातील वासरी वर हल्ला करून वासरी बळी घेतला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा