ओबीसी आरक्षण हक्क अबाधित ठेवण्यासाठी आरक्षण स्वसंरक्षण मेळावा यशस्वी करा- जे. पी. सपकाळे यांचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

ओबीसी आरक्षण हक्क अबाधित ठेवण्यासाठी आरक्षण स्वसंरक्षण मेळावा यशस्वी करा- जे. पी. सपकाळे यांचे आवाहन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर :- ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपला लढा सुरू असून त्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भुसावळ येथे येत्या २१ ऑक्टोबर रोजी  ओबीसी आरक्षण स्वसंरक्षण अधिकार महामेळावा घेण्यात येणार आहे. हा महामेळावा यशस्वी करा असे आवाहन समता परिषदचे जिल्हा सरचिटणीस जे.पी.सपकाळे यांनी केले. 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस जे.पी.सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.६ ऑक्टोबर शुक्रवारी जामनेर येथे सायंकाळी माळी समाज मंदीर सभागृहात बैठक पार पडली.
यावेळी जे. पी. सपकाळे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींच हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावे घेण्यात येत आहे.हे महामेळावे यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी म्हणाले की, ओबीसी समाजातील सर्व जाती समुदायाना एकत्रित करून होऊ घातलेल्या २१ तारखेच्या अधिकार मेळाव्यात सहभागी करून घ्या, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि समता सैनिकांना केले.याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष प्रा.उत्तम पवार सर यांनीही मार्गदर्शन करून जामनेर मधून जास्तीत जास्त संख्येने येणार असल्याचे मनोगत व्यक्त करत मेळावे यशस्वी करण्याचा निर्धार केला.यावेळी तालुका कार्याध्यक्ष पवन माळी, तालुकाध्यक्ष नरेश महाजन सर, शहराध्यक्ष विनोद माळी, समाज ट्रस्टी मुकुंदा माळी बळीराम चौधरी माजी सैनिक योगेश भाऊ झालटे पी एल महाजन सर गणेश भाऊ झाल्टे गणेश माळी सर प्रभु झाल्टे. महेंद्र माळी बबलू महाजन गोकुळ माळी युवराज माळी दीपक माळी दीपक माळी सर दत्ता नेरकर राजू महाजन सुरेश माळी.. यांच्यासह समाज बांधव .यांची उपस्थिती होती.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads