महाराष्ट्र
सामाजिक उपक्रम राबवून सुरज शहाजी सावंत यांचा वाढदिवस साजरा...
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : वडापूर ता.द.सोलापूर येथील प्रगतशील बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते , सिव्हिल इंजिनियर सुरज शहाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अंत्रोळी येथील जिव्हाळा (प्रौढ मतिमंद मुलांची) शेतकी कर्मशाळेत प्रथमता सुरज शहाजी सावंत यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मुलांना फळे व केक व खाऊचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त डीजे नाच गाणे जल्लोष असं सर्व प्रकार पाहायला मिळत असताना वडापूर ता.द.सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व इंजिनियर सुरज शहाजी सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या 9 वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबवितात. अंत्रोळी येथील जिव्हाळा शेतकी कर्मशाळा येथे फळे व खाऊचे वाटप केल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदन होत आहे व आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवत साजरा करत त्यांनी समाजासमोर कृतीयुक्त आदर्श ठेवला आहे.
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ. विलास बोलगांवकर , अधिक्षक शंकर काशिद सर व संजय गवळी तसेच शिवाजी सावंत,अजिंक्य पाटील युवक काँग्रेस सचिव, योगीराज शिंदे ,प्रगतशिल बागायतदार सचिन गुंड, जिव्हाळा शेतकी कर्मशाळा कर्मचारी वर्ग मोठया संख्येत उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा