महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ; एम. के. फाउंडेशनकडुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणे बाबत एम के फाउंडेशन च्या वतीने निवेदन देण्यात आले.
संपूर्ण दक्षिण तालुक्यातील खरीप हंगामातील पीक पावसाअभावी गेले असून, तसेच सरासरी पेक्षा पाऊस खूप कमी झाल्या कारणाने रब्बी हंगामातील पिकांचे देखील उत्पादन होणार नाही, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. अश्या ह्या कठीण परिस्थिती मध्ये दुष्कळग्रस्त तालुक्यांच्या जाहीर यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नसून हा तालुक्यातील शेतकरी व जनतेवर मोठा अन्याय आहे,तात्काळ दक्षिण सोलापूर तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त तालुका यादीत समावेश करावा अशी मागणी एम के फाऊंडेशन च्या वतीने महादेव कोगनुरे यांनी निवेदनाद्वारे केली.
जिल्हाधीकारी यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत महत्वाची विडिओ कॉन्फरन्स चालू असल्या कारणाने जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी माजी संचालक महादेव पाटील, सादेपूर सरपंच मलकारी व्हनमाने, प्रकाश वाघमारे, रविकांत चांदोडे, सुनील पारे, गुरुसिद्धप्पा बिराजदार, सागर नरोनी, मालप्पा घोडके, अमित मुळवाड, शरणु मुलगे, संजय केंगनार, पवन कोमूल, सोम करपे,पंचसेन गुरव,भीम बंदीछोडे, नूरअहमद बागवान यांच्यासह एम के फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा