अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जामनेर नूतन शहर कार्यकारिणी घोषित
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जामनेर नूतन शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भुसावळ जिल्हा संयोजक अजय सपकाळ प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंच्यावर प्रमुख अतिथी म्हणून कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य प्रा. श्री. किरण कुलकर्णी सर यांची उपस्थितीत लाभली.
अभाविप देवगिरी प्रदेश कार्यकारणी सदस्य पवन बावस्कर यांनी अभाविप ची नूतन कार्यकारणी मांडणी केली. यावेळी जिल्हा संयोजक यांनी कार्यकर्त्यांना परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो, म्हणून आपण सर्वांना मिळालेली जबाबदारीला योग्य न्याय द्यावा व राष्ट्रकार्यात सामील व्हावे, असे प्रतिपादन केले.जामनेर शहर नूतन कार्यकारीणी खालील प्रमाणे आहे.प्रशांत सुकलाल गव्हाळ शहरमंत्री, सिद्धांत सैतवाल शहर सहमंत्री,रितेश प्रताप देवरे शहर सहमंत्री,दिपाली पवार शहर सहमंत्री,अशफाक सलीम तडवी शहर सहमंत्री,पुरुषोत्तम माळी शहर महाविद्यालय प्रमुख,प्रविण अरुण जाधव शहर महाविद्यालय सहप्रमुख, वृषाली पाटील SFD संयोजक,विशाल मुळे SFD सहसंयोजक,नंदिनी भोई SFS संयोजक,स्वप्नील पारधी SFS सह संयोजक,गणेश काशिनाथ शिंदे SFS सह संयोजक,राहुल नाईक राष्ट्रीय कलामंच प्रमुख,कृष्णा राठोड राष्ट्रीय कलामांच सह प्रमुख,जयेश राजेंद्र जाट शहर एकलव्य संयोजक,वैष्णवी चौधरी शहर एकलव्य सह संयोजक,रोशन पाटील फॉर्मव्हिजन संयोजक,जितेंद्र पाटील फॉर्मव्हिजन सहसंयोजक,गोपाल चव्हाण अभ्यास मंडळ प्रमुख,प्रतिक विजय महाजन सोशल मीडिया संयोजक, प्रितेश राठोड शहर संपर्क प्रमुख,आकाश माळी शहर संपर्क सहप्रमुख,पूजा तळेकर विद्यार्थिनी प्रमुख,भाग्यश्री पाटील विद्यार्थिनी सह प्रमुख,रोहन जाधवजिज्ञासा संयोजक,विशाल एकनाथ राठोड
शहर कार्यकारणी सदस्य -
मयुरेश संजय चौधरी,गोपाल मते,अजय सपकाळ,पवन बावस्कर,प्रताप पारधी, नयन टिंटोरे,दर्शन वाघ,देवेंद्र चंद्रकांत महाजन,जोशी सागर.
महाविद्यालय कार्यकारणी
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अध्यक्ष म्हणून कुणाल हेमराज पाटील, महाविद्यालय उपाध्यक्ष विनायक पाटील,हितेश दशरथ मराठे यांना जबाबदारी देण्यात आली.कार्यक्रमाचे वेळी यश परवते यांनी गीत गायन केले, राहुल नाईक यांनी सूत्र संचालन केले व शहरमंत्री प्रशांत गव्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अभाविप जामनेर विद्यार्थी तक्रार निवारण साठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 9422974049, 9503221196 विद्यार्थ्याना शैक्षणिक समस्या असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हा संयोजक अजय सपकाळ यांनी केलं.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा