मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र सुपेकर यांची निवड
जामनेर तालुका मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली यात फत्तेपूर सजेचे तलाठी राजेंद्र विश्वनाथ सुपेकर यांची सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी तर महिला तलाठी सौ.पल्लवी वाघ यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
जामनेर तालुका मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक जामनेर येथे संपन्न झाली यात तालुका अध्यक्षपदी फत्तेपूर सजेचे तलाठी राजेंद्र सुपेकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ.पल्लवी वाघ यांची एकमताने निवड झाली दोघांनाही संघटनेच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या निवडी बद्दल सेवा निवृत्त मंडळ अधिकारी पांडूरंग माळी भिकाजी जोशी बंडू पाटील मनोहर तायडे पंडीत भोई आर.के. चौधरी वाकडी येथील मंडळ अधिकारी विष्णू अप्पा पाटील फत्तेपूर मंडळ अधिकारी सचिन जाधव तलाठी गणेश खोडवे अमोल कवर दगडू किरोते सुधाकर पाटील आदित्य लोखंडे नाना हिवाळे पंढरी कांबळे यासह फत्तेपूर परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी अभिनंदन केले राजेंद्र सुपेकर अतिशय मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून परिचीत आहे त्यांच्या खांद्यावर संघटनेने जी जबाबदारी टाकली त्यात ते आपल्या पदाला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करतील.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा