जामनेर येथे दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर येथे दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर संपन्न...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत जामनेर येथे दिव्यांग बांधवांसाठी ग्रामविकास मंत्री श्री.गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी शिबीर आयोजन करण्यात आले होते. सौ.साधनाताई महाजन खासदार रक्षा खडसे यांनी  दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप करण्यात आले. 
मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते, आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या जामनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज संबंधित कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आले.यावेळी खासदार रक्षा खडसे, सौ.साधनाताई महाजन, श्री.गोविंद अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष श्री.तुकाराम निकम, जिल्हा सरचिटणीस श्री.अतिष झाल्टे, श्री.राजमल भागवत, श्री.विलास पाटील, श्री.अमित देशमुख, श्री.तुकडूदास नाईक, श्री.नाना पाटील, श्री.सुभाष पाटील, श्री.रविंद्र झाल्टे, श्री.प्रशांत भोडे, श्री.बाबुराव हिवराळे, श्री.प्रफुल्ल लुंकड, श्री.मयूर पाटील, श्री.कैलास पालवे, श्री.सुभाष पवार, श्री.शुभम माळी सह उपस्थित होते 
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads