जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्ताईनगर येथील ८८ वर्षीय मतदार आजींच्या घरी दिली भेट ..
जळगावचे जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज मुक्ताईनगर येथील ८८ वर्षीय मतदार आजींच्या घरी भेट दिली. भारत निवडणूक आयोगाच्या दि 3 ऑक्टोबर 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आजींना निवडणुकीत मतदान करणे सुलभ करण्यासाठी पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल, ही माहिती देऊन संवाद साधला.भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक 52/2020/SDR/VOL.I च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्येष्ठ मतदारांना निवडणुकीत मतदान करणे सुलभ करण्यासाठी पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करुन देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे, पुढील निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा