जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद जळगाव द्वारे असलेल्या विविध प्रशासकीय कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा - दैनिक शिवस्वराज्य

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद जळगाव द्वारे असलेल्या विविध प्रशासकीय कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जिल्हा परिषद जळगाव द्वारे असलेल्या विविध प्रशासकीय कामांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला.  जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध योजनांचे नियोजन तसेच व्यक्तीगत लाभाच्या तसेच सार्वजनिक लाभाच्या विविध योजनांचे लाभार्थी निश्चीतीचे कामकाज गतिमानतेने पूर्ण केलेबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.
नियोजित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर वेगाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या. विकसित संकल्प भारत यात्रेचे कामकाज नियाजनबध्द रित्या पूर्ण होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना ही या प्रसंगी गटविकास अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads