जामनेरात धीरज साहू यांचा पुतळा जाळून आंदोलन...
काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या कार्यालयात करोडो रुपयांची रोकड सापडली, त्याविरोधात आज जामनेर नगर परिषद समोर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
पदाधिकाऱ्यांनी हातात विविध फलक घेऊन आंदोलन केले. काँग्रेस गोलमाल जनतेचे हाल... मळलेला हात करतो जनतेचा घात... काँग्रेस हटाव गरीब बचाव... अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे चौक परिसर दणाणून गेला.याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा