आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब हे आनंदी असते..डॉ. जगदीश पाटील
आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते.घरातील कुटुंबाचे आरोग्य सुदृढ असेल तर संपूर्ण आयुष्य सुखकर असते.तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या.रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे.गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या,असा मोलाचा सल्ला डॉ. जगदीश पाटील यांनी दिला. दैनिक शिवस्वराज्य
न्यूज पोर्टल तसेच निर्भिड खान्देश न्युज पोर्टल ला डॉ.जगदीश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत,आजही असंख्य नागरिक अत्याधुनिक वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत.बऱ्याचवेळा ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी व महागडय़ा वैद्यकीय उपचारासाठी शहरात धाव घ्यावी लागते.आर्थिक अडचण व योग्य उपचार न मिळाल्याने 70 ते 80 टक्के आकस्मिक दुर्घटना आपल्या घरातच घडतात.अशा दुर्घटना घडू नये यासाठी जीवनात मदतीचे मूलभूत उपाय शिकणे आवश्यक आहे.गरजू रुग्णांना आकस्मिक वैद्यकीय सेवा मिळावी,या सामाजिक बांधिलकी जपणारे व रुग्णांना योग्य उपचार व "रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा"या संकल्पनेतून डॉ. जगदीश पाटील यांनी ग्रामीण भागात जामनेर तालुक्यात सतत रुग्ण सेवा करत आहे.बऱ्याच वर्षापासून रुग्णांना सवलतीच्या दरात अत्याधुनिक सेवा देण्याचा आमच्या रुग्णालयाचा प्रयत्न असतो अशी माहिती डॉ. जगदीश पाटील यांनी दिली
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा