अवैध गौणखनिज दंड न भरल्याने मालमत्तेचा 27 मार्च रोजी लिलाव
मालमत्तेचा 27 मार्च रोजी लिलाव
दि. 27 जामनेर येथील गट क्र.304/2/ब/१ क्षेत्र हे. ०.८१ ही स्थावर मालमत्ता कसुरदार श्री. सुरेशचंद्र दिपसंद्रजी साबद्रा जामनेर यांनी अवैध गौणखनिज दंड न भरल्याने शासन जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे दंडाची वसुली करणेसाठी या मालमत्तेचा जाहीर लिलाव २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११. वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे ठेवला आहे. ज्या कुणाला ही मालमत्ता घ्यायची असतील त्यांनी २२ मार्च, २०२४ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपावेतो तहसिल कार्यालय, जामनेर येथे संपर्क साधावा, असे तहसिलदार जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा