पेहल दि इनिटिएटर या सामाजिक संस्थेमार्फत जि.प शाळा चिंचखेडे बु येथे चार लॅपटाॅप आणि एक टॅब भेट... - दैनिक शिवस्वराज्य

पेहल दि इनिटिएटर या सामाजिक संस्थेमार्फत जि.प शाळा चिंचखेडे बु येथे चार लॅपटाॅप आणि एक टॅब भेट...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली तर ते उत्तूंग भरारी घेतील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.दिलीप खोडपे सर यांनी जि.प.शाळा चिंचखेडे बु|| येथील  कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.आजच्या या विद्यार्थ्यांना त॔त्रज्ञान शिक्षण मिळावे म्हणून पेहल दि इनिटिएटर या सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांनी आभार व्यक्त केले.
    चिंचखेडे बु|| येथील रहिवाशी आणि पेहल दि इनिटिऐटर या संस्थेचे सचिव भूषण (प्रशांत )भागवत पाटील आणि माजी सरपंच युवराज दादा पाटील यांच्या सहकार्याने दिनांक 24/2/2024 रोजी जि.प.प्राथमिक शाळा चिंचखेडे बु|| येथे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षणासाठी चार लॅपटाॅप आणि एक टॅब देणगीरुपाने मिळाला.सदर देणगी वितरण कार्यक्रम प्रसंगी आमच्या शाळेतील गोरगरिबांच्या मुलांसाठी पेहल या संस्थेमार्फत मिळालेले हे अनमोल साहित्य विद्यार्थ्यांना अध्ययनअध्यापनात  फार उपयोगी होणार असून ही शाळा आपल्या सदैव ऋणात राहील असे मुख्याध्यापक नथू माळी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
यावेळी या संस्थेचे अध्यक्ष मा.मूर्तझा मोतीवाला,उपाध्यक्ष मा.विनय परदेशी आणि सचिव भूषण पाटील यांचा शाळा आणि गावातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला.श्री भूषण पाटील (सचिव)यांनी आपल्या मनोगतातून पेहल संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.ही स॔स्था ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांनाच मदत करीत असते असे आवर्जून सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री दिलीप खोडपे सर ,माजी पंचायत समिती सभापती मा.श्री चंद्रशेखर काळे,पं.स. सदस्य अमरभाऊ पाटील ,माजी सरपंच धनराज (बापू)पांडूरंग पाटील, माजी सरपंच युवराज दादा पाटील, माजी सरपंच पांडूरंग आप्पा पाटील, वि.का.स.सोसायटी चेअरमन रविंद्र पांडूरंग पाटील(आप्पा), विद्यमान सरपंच सौ ज्योतीताई रमेश पारधी,उपसरपंच अनिताताई गोपाळ कोळी ,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रसूलभाऊ पिंजारी, बशीर शेख ,विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष सुनिल भाऊ कोळी, ग्रामप॔चायत आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामसेविका ममताताई पाटील आणि ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,शिक्षकवृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पदवीधर शिक्षक किशोरकुमार डकले यांनी तर आभारप्रदर्शन सौ.मनिषा ठाकूर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपरोक्त सर्वांचे सहकार्य लाभले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads