जिल्हा वार्षिक नियोजन मधून स्पीलचे कामं पूर्ण करण्याची मुदत 31 मार्चच - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा वार्षिक नियोजन मधून स्पीलचे कामं पूर्ण करण्याची मुदत 31 मार्चच

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव दि.22  जिल्हा वार्षिक नियोजन मधून सन 2022 - 23 मध्ये दिलेल्या मान्यताचे स्पीलचे काम करायचे असेल तर त्याच्यासाठी 31 मार्चची मुदत असेल. त्यानंतर लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून दिला जाणार नाही असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
    जिल्हा वार्षिक नियोजन मधून दिलेल्या विविध शासकीय कामाचा आढावा अल्प बचत भवन मध्ये जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी एकात्मिक प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि सर्व कार्यान्वीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
 जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीसाठीच्या प्रलंबित प्रशासकीय मान्यता घेऊन नियमानुसार कार्या आदेश काढावेत असे सांगून ज्यांचे कामं सुरु आहेत त्यांनी तात्काळ कामं पूर्ण करून उदघाटन करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. कार्यादेश देऊनही ठेकेदाराकडून विहित मुदतीत काम झाले नाही तर अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads