अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जामनेर युवक तालुकाध्यक्ष पदी अशोक पाटील यांची नियुक्ती..
दि.17 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या आदेशाने व युवक प्रदेश उपाध्यक्ष दिव्यांक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष विश्वजित भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा अशोक कृष्णा पाटील , रा.केकतनिंभोरे यांच्या गेल्या वर्षभराच्या मराठा समाजासाठी च्या योगदानाचा कार्य अहवाल पाहता त्यांचे मराठा महासंघाचे तालुका संपर्क अभियान व मराठा योध्दा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ म्हणून केलेल्या दोन्ही उपोषणाची दखल म्हणून त्यांची पुन्हा जामनेर युवक तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे तालुक्यातून व मराठा समाजातून सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा