मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रीती कुमावत सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश.. - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रीती कुमावत सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशन सोहळ्या ठिकाणी शिंदे गटात प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाल्याची लोकांची भावना आहे. त्यांना वाटतंय की हे सरकार आम्हाला न्याय देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊया असे मुख्यमंत्री  म्हणाले आहेत.यावेळी  रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तालुकाप्रमुख भरत पवार, नरेंद्र धुमाळ, दीपक कोळी,श्याम बोरसे, अंकुश जोशी, प्रीती कुमावत,वैशाली साळुंके, कल्पना बुंदेले, वैशाली विसपुते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads