लोहारा येथील अक्षयकुमार जैस्वाल यांच्या सरपंच अपात्रतेच्या निकालास ग्रामविकास मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या न्यायालयाकडून स्थगिती - दैनिक शिवस्वराज्य

लोहारा येथील अक्षयकुमार जैस्वाल यांच्या सरपंच अपात्रतेच्या निकालास ग्रामविकास मंत्री मा.गिरीषभाऊ महाजन यांच्या न्यायालयाकडून स्थगिती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
लोहारा ---लोहारा ता.पाचोरा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्या विरुद्ध म. मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगांव यांनी म. विभागीय आयुक्त नाशिक यांच्या न्यायालयात अपील अर्ज क्रं.5/2023 महाराष्ट्र ग्रा. पं.अधिनियम 1958 चे 39 (1)  नुसार सरपंच पद अपात्र करणे संदर्भात अर्ज केला होता.
सदर अपील अर्जामध्ये दि.6-2-2024  रोजी नाशिक आयुक्त यांनी निकाल पारित करून सरपंच पद पुढील उर्वरित काळासाठी अपात्र करण्यात आले होते.
सदर निर्णया विरोधात कायद्याच्या नियमानुसार अक्षयकुमार जैस्वाल यांनी राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम 1958 चे कलम 39 (3) नुसार  दि.8-2-2024 रोजी अपील अर्ज दाखल केला. सदर अपीलाची सुनावणी  व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दि.16-2-2024 रोजी झाली असता, अपील अर्जदार जैस्वाल   यांनी स्वतःहा आपली बाजू मांडली. तसेच अपील अर्जातील सामनेवाले सर्व हजर होते.
ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार राज्यमंत्री नसल्याने ग्रामविकास मंत्री मा.गिरीश भाऊ महाजन यांनी सर्व पक्षकारांची बाजू ऐकून त्यांच्या न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणाचे अवलोकन केले असता, सदर प्रकरणात अपहार किंवा  भ्रष्टाचार झाला  नसून कामकाज करतांना अनियमितता झाल्याचे दिसून येते म्हणून वस्तुस्थिती  विचारात घेत विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या  दि.6-2-2024 रोजीच्या आदेश्यास पुढील आदेशा पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
वरील सर्व बाबी पाहता अक्षयकुमार जैस्वाल  यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त नाशिक यांनी दि.6-2-2024 रोजी दिलेला निकाल वस्तूस्थितीला  धरून नाही, तसेच बेकायदेशीर  असल्याबाबत त्यांनी  दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कारण, दि. 30-1-2024 रोजी मा. विभागीय आयुक्त यांच्या दालनात माझ्या वतीने वकिलांमार्फत अर्जदार यांनी केलेला अर्ज व त्या सोबतचे इतर कागदपत्रे लेखी मागणी केली होती. सदर अर्ज विभागीय आयुक्त यांनी  मंजूर करून तशी रोजनाम्यावर उल्लेख ही केलेला आहे. 
सदर मागणी नुसार अर्जदारास कागदपत्रे पुरवावे आदेशीत केले.व राजनाम्यामध्ये पुढील सुनावणी  दि.6-2-2024 रोजी ठेवल्याचे रोजनाम्यावर दिसून येते.
परंतु विभागीय आयुक्त यांनी मला कुठलेही काही आरोपपत्र व कागदपत्रे न देता दि.30-2-2024  रोजी सुनावणी न घेता फाईल बंद केली व निकालावर ठेवली.  व दि.6-2-2024 रोजी  बेकायदेशीर निकाल पारित केला. यानंतर दि.16-2-2024 रोजी माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत बाजू मांडण्यात आली. त्यानुसार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे  मी स्वागत करतो, व न्यायालयाचे आभार ही मानतो . असे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads