माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना वाढदिवसानिमित्त कमलदृष्टी अभियानातील जेष्ठ महिला रूग्णाकडून भरभरून आर्शिवाद
माजी खा. डॉ. उल्हास पाटील कमलदृष्टी अभियानातील जेष्ठ महिला रूग्णाकडून वाढदिवसानिमीत्त भरभरून आर्शिवाद मिळाले.श्रीमंती ही माणसाच्या कृतीतून लक्षात घेतली जाते पैश्याने श्रीमंत असणा—या प्रत्येकाला जनसामान्यांच प्रेम मिळेलच असे नाही. पण देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना नेहेमीच जनसामान्यांकडून प्रेम मिळाले आहे आणि त्यांच्या विचारधारेत नुकतेच कॉग्रेसमधून भाजपावासी झालेले माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना देखिल सामान्यांनी भरभरून प्रेम दिले आहे, याचा प्रत्यय काल दि २३ रोजी वाढदिवसानिमीत्त आयोजित कमलदृष्टी अभियानात आला.
६४ व्या वाढदिवसानिमीत्ताने भाजपा वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६४ जेष्ठ नागरिकांच्या फेको पध्दतीने मोतिबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. या रूग्णांशी डॉ. उल्हास पाटील यांनी संवाद साधल्यानंतर एक गरीब जेष्ठ महिला रूग्णांने माजी खा. यांना २० रू नोटेने ओवाळत भरभरून आर्शिवाद दिले. यावेळी महिलेच्या डोळयातील प्रेम आणि अश्रू पाहून उपस्थीतांचे डोळेही पाणावले. अगदी गरीब असलेल्या महिला रूग्णांची मनाची श्रीमंती पाहून माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना गहीवरून आले. यावेळी मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना आर्शिवाद देत या महिलेने जणू २०२४ लोकसभेत मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील असे संकेत दिले.
तुमच्या डोळयात दिसेल डॉ. उल्हास पाटीलांची प्रतिमा डॉ. नि.तु. पाटील
यावेळी अभियान प्रमुुख तथा भाजपा वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांनी संबोधित करतांना सांगितले नेत्यांच्या वाढदिवसानिमीत्त मोठे समारंभ होत असतात पण माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे अपवाद आहेत. आई गोदावरी सेवा अभियानातून प्रेरणा घेत गोरगरीब, दरीद्रीनारायण रूग्णांना "कमलदृष्टी" मिळावी हया हेतूने हया अभियानाचा संकल्प घेतला असून 64 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. हे रूग्ण कुठल्याही नेत्ररोग तज्ञांकडे गेल्यास त्यांनातपासणी केल्यावर तुमच्या डोळयात डॉ. उल्हास पाटील यांची प्रतिमाच दिसेल असे सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा