महाराष्ट्र
सामाज सेवकांसह संस्थाना शासनाचे पुरस्कार घोषित जिल्ह्यातील 5 व्यक्तींचा सामावेश : 12 मार्चला मुंबईत वितरण
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्टयपूर्ण काम करणा-या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाच्या वतीने पात्र व्यक्ती व संस्थांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात येते. या अनुषंगाने विविध पुरस्काराची घोषणा शुक्रवारी शासनाने केली असून, जिल्ह्यातील 5 व्यक्तींची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पात्र व्यक्ती व संस्थांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात येते. समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी जिल्ह्यातील 5 पुरस्कार घोषित व्यक्तींची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पुरस्कारचे वितरण मुंबई येथील नॅशनल, सेंटर फॉर परफॉर्मिग आटस, जमशेद भाभा नाट्यगृह, एन सी पी ए मार्ग, नरीमन पाइंट, मुंबई येथे दि. 12 मार्चला सकाळी 11 वाजता राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदय मा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरणचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यांचा होणार सन्मान:- श्री. विठ्ठल आण्णा पाथरुट (सन-2019-20- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार), श्री. विलास भिवा लेंगरे (सन-2019-20-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार) , श्र. प्रवीण दत्तात्रय माने (सन-2021-22-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार), श्री.सुरेश वसंत कसबे (सन-2019-20 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार),श्री जयद्रथ तुकाराम जाधव (सन-2021-22 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा