महाराष्ट्र
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान: गोदाम बांधकामासाठी अनुदान योजना
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर -: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकामासाठी तसेच बिज प्रक्रिया यंत्र खरेदीसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघानी तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये 15 मार्च 2024 रोजी पर्यंत ऑफलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून ग्रामीण भंडारण योजना , नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. तसेच बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बिज प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बिज प्रक्रिया यंत्र खरेदीसाठी 8000 रुपये प्रति युनिट किंवा किंमतीच्या 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे.
इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांनी तालुकास्तरावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.गावसाने यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा