भव्य वाघुर उपसा सिंचन भूमिपूजन सोहळा संपन्न .. - दैनिक शिवस्वराज्य

भव्य वाघुर उपसा सिंचन भूमिपूजन सोहळा संपन्न ..

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज गारखेडा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील वाघूर उपसा सिंचन योजना क्रमांक १ आणि २ अंतर्गत ३८१० शेततळे व शेततळ्यांना जोडणाऱ्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामाचे तसेच वाघुर पाणलोट क्षेत्रात ४७ गाळरोधक बंधाऱ्याच्या कामांचे भुमिपूजन सोहळा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रकल्पाद्वारे मतदारसंघातील जलसाठा हा मोठ्या प्रमाणात वाढणार असून शेतकऱ्यांना आधार देणारा हा प्रकल्प आहे.याप्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मा. व्ही. डी. पाटील साहेब. मा. संजय गरूड, जे के चव्हाण, मा. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे,  भारतीय जनता पक्षाचे माननीय चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, अरविंद देशमुख, अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, महेंद्र बाविस्कर, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads