महाराष्ट्र
अंत्रोळी येथे जागतिक महिला दिन उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा...
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : दरवर्षी ८ मार्चला जागतिक पातळीवर महिला दिन साजरा केला जातो. समाजातील स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करुण देणे, त्यांचा आदर आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महिला असणे हा शाप नसून वरदान आहे, हेही आज महिलांना सांगण्याची गरज आहे.
या महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे ग्रामपंचायत अंत्राळी तर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले. संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, बुक बॅलन्स या स्पर्धा घेऊन विजेता महिलांना नवनिर्माण ग्राम संघाकडून बक्षीस वाटप करण्यात आले. व सरपंच मायाताई सलगरे यांच्याकडून सर्व उपस्थित महिलाचा सत्कार व महिला बचत गटातील व सर्व महिलांना खाऊ वाटप करण्यात आले. व तसेच ग्रापंचायत अंत्रोळी यांच्याकडून महिलांना महाशिवरात्रीच्या निमित्त फराळ व सुगंधी दूध वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली कोळी व हौसाबाई करपे यांनी केले. व सर्व शासकीय योजनांची माहिती पोस्टमन साक्षी कोळी यांनी दिली व त्यांना पोलीस कॉन्स्टेबल संतोषी कांबळे व प्रियंका केंगार यांनी मदत केली.ग्रामसेवक गणेश फडतरे यांनी महिलांचे आभार मानले
कार्यक्रमाचे नियोजन कल्पना सोनकवडे आणि लक्ष्मी करपे व अंत्रोळी ग्रापंचायत यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमास सरपंच माया ब्रम्हदेव सलगरे, रुपाली नागनाथ कोळी ,कल्पना प्रकाश सोनकवडे, लक्ष्मी सुभाष करपे ,प्रियांका चांगदेव केंगार, हौसाबाई राजु करपे,सारिका सलगरे, तेजस्विनी जाधव,शामल गुरव, साक्षी कोळी,संतोषी कांबळे,सविता शिंदे ,रंजना धेंडे, पुजा तानाजी थोरात ,राजश्री कोळी व तसेच ग्रामपंचायत शिपाई संजय ज्ञानदेव कोळी ,नायाजी जनार्दन केंगार ,ग्रामसेवक गणेश सुरेश फडतरे ,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बडगर , इन्नुस खाजाभाई शेख , बापूसाहेब रहिमान शेख , उपसरपंच सोनाली आदिनाथ खरात, कोमल करपे ,सारिका थोरात कुंभकर्ण कांबळे, प्रतिष्ठित नागरिक गजीनाथ विलास शेजाळ, चिदानंद परिक्षाळे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नवनिर्माण ग्रामसंघ अंत्रोळी सर्व बचत गटातील अध्यक्ष, सचिव व सदस्य स्वयंशिक्षण प्रयोग सोलापूर भरारी प्रोडूसर कंपनी महिला सभासद व ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा