जामनेर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री निळकंठ पाटील यांची निवड... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री निळकंठ पाटील यांची निवड...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली.उपसरपंच  पदी दोन अर्ज दाखल झाले होते.यावेळी मतदान होऊन ७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी निळकंठ वसंतराव पाटील यांना चार मते मिळुन विजयी झाले.ग्रामसेवक भगवान बोरसे यांनी कामकाज पाहिले. सविस्तर वृत्त शेळगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. श्री निळकंठ पाटील यांना चार मते तर कमलबाई राजपूत यांना तीन मते पडली श्री नीलकंठ पाटील हे सुमारे 18 महिन्यापासून उपसरपंच होते परंतु काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु पुन्हा एकदा सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली. आता पुन्हा शेळगाव येथे भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील अशी आशा सदस्यांनी व्यक्त केली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads