महाराष्ट्र
वडापूर येथील ग्रामदैवत प्रभूलिंग यात्रेनिमित्त सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक अमर रतिकांत पाटील यांनी प्रभुलिंग देवस्थानास दिली सदिच्छा भेट...
समीर शेख प्रतिनिधी
वडापूर : दि. 9 मार्च रोजी पासून वडापूर ता. द. सोलापूर या गावचे ग्रामदैवत प्रभुलिंग यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा तीन दिवस सुरू राहणार असून पहिल्या दिवसी प्रभुलिंग देवाच्या दोन्ही पालख्याची व काठ्यांचे मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून पायघड्या अंथरून ढोल ताशाच्या व पारंपरिक हलग्या च्या निदानात भव्य अशी सुरुवात करण्यात आली असून या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व लहान थोर अबाल वृद्ध व सर्व समाज बांधवांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदविला असून या यात्रेत तरुण युवकांचा मोठा प्रमाणात सहभाग लाभला होता.
या यात्रेस व देवस्थानास सिद्धेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अमर रतिकांत पाटील यांनी प्रभु लिंगमंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने कमिटीचे प्रमुख अरुण पाटील सर ,पंडित पुजारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटतालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शिवसेनेचे दक्षिण तालुका विभाग प्रमुख अशोक हजारे , ज्ञानेश्वर पाटील, दिनेश कदम, रमेश पाटील, नेमांना पुजारी, अमर पाटील यांचे सहकारी धर्मराज बगले, पांडुरंग पाटील, तुकाराम भंडगे, प्रभाकर गरड, रमेश पाटील, किरण वाघचवरे व अनेक युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा