दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी महासिध्द साळवे यांची बिनविरोध निवड.... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी महासिध्द साळवे यांची बिनविरोध निवड....


समीर शेख प्रतिनिधी
  सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप येथे पत्रकार संघाची शनिवारी सकाळी ११ वाजता बैठक झाली. दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 
यावेळी बैठकीत नूतन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला.यावेळी पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. इतर पदाधिकारी म्हणून तालुका उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे महासिध्द साळवे तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे आणि कार्याध्यक्षपदी पुढारीचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 
  यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले, दक्षिण सोलापूर मधील पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून पत्रकार गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांना विमा संरक्षण योजना लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिले.     
   यावेळी पुढिल प्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी, उपाध्यक्षपदी महासिद्ध साळवे , सचिवपदी नितीन वारे , कार्याध्यक्षपदी शिवराज मुगळे, कोषाध्यक्षपदी दिनकर नारायणकर, प्रसिध्दी प्रमुखपदी बबलू शेख, संघटकपदी आनंद बिराजदार, सहसचिवपदी अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी महेश पवार, गजानन काळे, बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी,शिवसिध्द कापसे, संगय्या स्वामी, आरिफ नदाफ, अंबादास कापसे यांची निवड करण्यात आली.
   व तसेच सल्लागारपदी विजय देशपांडे, नारायण चव्हाण, राजकुमार सारोळे, अमोगसिध्द लांडगे, विनोद कामतकर, नंदकुमार वारे, समीर शेख यांची निवड करण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads