आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी व पदाधिका-यांचा सत्कार.... - दैनिक शिवस्वराज्य

आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी व पदाधिका-यांचा सत्कार....


समीर शेख प्रतिनिधी
  सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्यासह सर्व नूतन पदाधिका-यांचा आमदार सुभाष देशमुख यांनी सत्कार केला. 
  यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, पत्रकार बंधूनी समाजातील समस्या निर्भीडपणे मांडून जनतेला न्याय मिळवून द्यावेत, तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासात आपल्या लेखनीच्या माध्यमातून योगदान द्यावेत असे आवाहन करू नूतन पदाधिका-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
   यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण चव्हाण, राजकुमार सारोळे, अमोगसिध्द लांडगे,प्रशांत कटारे, उपाध्यक्ष महासिद्ध साळवे, सचिव नितीन वारे, कार्याध्यक्ष शिवराज मुगळे, कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर,प्रसिध्दी प्रमुख बबलू शेख,संघटक आनंद बिराजदार,सहसचिव अप्पू देशमुख व अशोक सोनकंटले, कार्यकारिणी सदस्य गजानन काळे,बालाजी वाघे, शिवय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, बिरु रूपनुरे, कलय्या स्वामी, संगय्या स्वामी, आरिफ नदाफ, महेश पवार, बनसिद्ध देशमुख, अभिजीत जवळकोटे आदी उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads