महाराष्ट्र
मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला रूट मार्च....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मंद्रूप पोलिस ठाणे हद्दीतील परिसरात रूट मार्च काढण्यात आला.
विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली असून लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, त्या दृष्टीने १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान पर्यत मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव, येळेगाव, गुंजेगाव, निम्बर्गी, साधेपूर, लवंगी व मंद्रूप या गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करिता सीआयएसएफ चे ५० शस्त्रधारी जवान, पोलीस मुख्यालयाकडील आरसीबी चे ३० जवान, पोलीस ठाणे कडील ०२ अधिकारी १० पोलीस अंमलदार असे एकूण ०२ अधिकारी व ९० जवान हजर असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा