मंद्रूपच्या अभिजीत जवळकोटे व रेश्मा जवळकोटे यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या एलएलसी ऑफिस अश्वथ इन्फोटेक मार्फत पुरस्कार.... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूपच्या अभिजीत जवळकोटे व रेश्मा जवळकोटे यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या एलएलसी ऑफिस अश्वथ इन्फोटेक मार्फत पुरस्कार....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर डफरीन चौकातील आय. एम. ए हॉल येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे एलएलसी ऑफिस अश्वथ इन्फोटेक मार्फत मंद्रूपच्या डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक अभिजीत जवळकोटे व रेश्मा जवळकोटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
   अभिजीत जवळकोटे यांनी एमएससी आटी व क्लिक डिप्लोमा कोर्स चे 350 पेक्षा जास्त प्रवेश नोंदवून दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवले आहेत. केंद्र चालक हा संगणक ज्ञानामध्ये झालेले नवनवीन बद्दल स्वतःमध्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना सखोल ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा बनून एमएस-सीआयटी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कोर्स घरोघरी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो या त्यांच्या कौतुकास्पद कामाचा सन्मान करण्यासाठी एमकेसीएलच्या एलएलसी सोलापूर मार्फत जिल्ह्यातील सर्व केंद्र चालकांना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल तसेच 2024 च्या व्यवसाय वृद्धीकरिता व आपल्या कामाची योग्य दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान सोहळ्याचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोलापूर दक्षिण, उत्तर अक्कलकोट तालुक्यातील केंद्र चालक आपल्या सुविद्य पत्नीसह उपस्थित होते. 
       याप्रसंगी एलएलसी ऑफिस सोलापूरचे जिल्हा समन्वयक रोहित जेऊरकर व त्यांच्या पत्नी तेजल जेऊरकर, जिल्हा समन्वयक हरून शेख , मलिक शेख, विपणन सल्लागार हबिब पंजेवाले, शेखर अडगळे, अविनाश जवळकोटे, उपस्थित होते. अभिजीत जवळकोटे व रेश्मा जवळकोटे यांना एमकेसीएल मार्फत लोणावळा ट्रिप सुद्धा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरून शेख, प्रस्तावना जिल्हा समन्वयक रोहित जेऊरकर सर तर आभार मलिक शेख यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads