आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक - दैनिक शिवस्वराज्य

आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. बैठकीला उपवनसंरक्षक यावल श्री. जमीर शेख, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांची उपस्थिती होती. 
बैठकीत ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित वैयक्तीक व सामुहिक वनदाव्यांचा आढावा घेण्यात आला. स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्याची प्रलंबित प्रकरणांचा आढावा, प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना अंमलबजावणीचा आढावा, पेसा ग्रामपंचायतीमध्ये 5% आबंध निधीची प्रभावी अंमलबजावणी करणे व अमृत आहार योजना अंतर्गत अंगणवाड्यांना सकस आहार पुरविणेबाबतचा आढावा, केंद्रीय योजना, ठक्कर बाप्पा योजना प्रलंबित प्रकरणे निर्गत करणे बाबत निर्देश देण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads