ऊसतोड मजूर लागले परतीच्या प्रवासाला ; बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला... वडापूर येथील कामगारांना समाजसेवक महादेव अप्पासाहेब पुजारी यांच्याकडून संपूर्ण कपड्याचा आहेर व स्नेहभोजन ... - दैनिक शिवस्वराज्य

ऊसतोड मजूर लागले परतीच्या प्रवासाला ; बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला... वडापूर येथील कामगारांना समाजसेवक महादेव अप्पासाहेब पुजारी यांच्याकडून संपूर्ण कपड्याचा आहेर व स्नेहभोजन ...


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम उरकत आल्याने ऊसतोड मजुरांची घरवापसी सुरु झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून पेटलेली धुराडी आता बंद होऊ लागली आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सोलापूर ,नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील कामगार कुटुंबियांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
    वडापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील वाहन मालक महादेव अप्पासाहेब पुजारी यांनी वडापुर येथील ऊसतोड कामगारांना एकत्र करून चालू गळित हंगामासाठी जास्तीत जास्त ऊस वाहतूक व्हावी यासाठी ऊस तोड कामगारांना सोयी सुविधा पुरवली.
    ऊस वाहतूकदार बागायतदार महादेव अप्पासाहेब पुजारी यांनी स्थानिक ऊसतोड कामगारांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत हातभार लागावा व गावातील ऊसतोड कामगार बाहेरगावी न जाता त्या कामगारांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने पुजारी यांनी अकरा ऊसतोड कामगारांना एकत्र करून गावातच त्यांच्या रोजगार उपलब्ध करून दिला चालू गळीत हंगामात त्यांनी जास्तीत जास्त ऊस वाहतूक करण्याचा मानस त्यांनी केला होता त्याचप्रमाणे त्यांनी या हंगामात 1750 टन वाहतुक केली.
 दि.14 मार्च रोजी वडापूर येथील ऊसतोड कामगारांनी लास्ट दिवशी उसाचा पट्टा कशा पद्धतीने पाडला ऊसतोड कामगारांनी आज खूपच आनंदाने आणि खूप मजा करत आज ऊस तोडण्याचा पट्टा पाडला. गुलाल उधळून ट्रॅक्टर वर गुलाल उधळून एकमेकांना गुलाल लावून पट्टा पडला म्हणजेच आज लास्ट दिवशी कारखान्याला लास्ट दिवशी लास्ट खेप पाठवून ऊस तोडण्याचे काम बंद केले.
    यावेळी वाहनमालक महादेव अप्पासाहेब पुजारी याच्याकडून सर्व ऊसतोड कामगारांना संपुर्ण कपड्याचा आहेर व तसेच स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
 यावेळी प्रमुख उपस्थिती संजय ज्ञानदेव पुजारी, भारत नागनसुरे, तानाजी कदम, धोंडीबा पुजारी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी, महादेव कोळी, रणसिद्ध पुजारी, मलकारसिद्ध पुजारी, अमोगसिद्ध पुजारी, नागनाथ पुजारी, विजय पुजारी, ध्रुव भडंगे, रोहन पुजारी, अमर पुजारी, सोनराज पुजारी, रमेश पुजारी, ज्ञानेश्वर जाधव, व कामगार चंद्रकांत भडंगे , सुभाष पारसे मिलिंद कांबळे, तुकाराम पारसे , गोविंद पारसे, प्रकाश भडंगे ,आतिश शिरसागर, विठ्ठल भडंगे, हनुमंत पारसे, पंपु साळवे व महादेव पुजारी मित्र परिवार उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads