आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा.... - दैनिक शिवस्वराज्य

आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा....


समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : आमदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात दौरा केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे
 मतदारसंघातील गाभेट दौऱ्यात मतदाराशी संवाद साधताना भाजप सरकारने दहा वर्षात शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत यावेळी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मतदारांना सांगितले.
       धर्म व जातीवर मतदान मागण्या पेक्षा काम करून कामाच्या जोरावर मत मागितली पाहिजे मात्र भाजप जाती व धर्माचा आधार घेत निवडणुकीला सामोरे जात आहे.
 भाजप आपल्या हातून सर्व काही हिसकावून घेत आहे आपल्याकडे राहिला मतदानाचा अधिकार तो पण हिरावून घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी लोकशाही टिकवण्यासाठी शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी ग्रामस्थना केले.
        दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हतुर, वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, कंदलगाव, अंत्रोळी, कुसूर, तेलगाव, भंडारकवठे, सादेपुर, कारकल, माळकवठे, या ठिकाणी गावभेट दौरा झाला.
  या दौऱ्यात जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, मनोज यलगूलवार, नगरसेवक बाबा मिस्त्री, राधाकृष्ण पाटील, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे व अनंत म्हेत्रे, आधी उपस्थित होते.
यावेळी अंत्रोळी येथील आनंदकुमार अंत्रोळीकर, मजनोद्दीन पठाण, प्रकाश कोकरे, दत्तात्रय थोरात, सिध्दु बंडगर, नानाप्पा करपे, बलभिम करपे, बाळासाहेब थोरात,जब्बार शेख, दावल शेख, रावसाहेब परिक्षाळे, चंद्रकांत कोकरे, काशीनाथ काबळे, गंगाराम कर्वे , रघुनाथ काबळे, श्रीकांत शेजाळ, सोसायटी सेक्रेटरी सलिम शेख,व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads