शिक्षकांचे योग्य पद्धतीने समायोजन करून आणल्या बद्दल शिक्षकांकडून शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील यांचा सत्कार.....
जळगांव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत त्रुटी दूर करून योग्य पद्धतीने समायोजन करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन व शिवसेनेच्या वतीने पुढाकार घेऊन योग्य समायोजन घडवून आणल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांकडून शुभांगी ताई पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे 100 शिक्षक हे सन 2022- 23 च्या संच मान्यते मध्ये अतिरिक्त ठरवण्यात आलेले होते. या शिक्षकांचे शासनाकडून इतर शाळांवर समायोजन करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली परंतु या प्रक्रियेमध्ये प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यां कडून अनेक गैर प्रकारे त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या व चुकीच्या पद्धतीने समायोजना ची प्रक्रिया राबवण्यात आली त्यामुळे या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते व भविष्यात त्यांचे हाल होणार होते. यासंदर्भात अनेक शिक्षकांनी शिवसेनेच्या उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगीताई पाटील यांच्याकडे तक्रार केली होती व समायोजां ना बाबत अवलंबण्यात आलेल्या प्रक्रिया कशाप्रकारे चुकीचे आहे हे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेनेच्या उपनेते शुभांगीताई पाटील सविस्तर माहिती घेत तात्काळ सदर समायोजनात झालेल्या गैर प्रकाराची लेखी तक्रार राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे सो यांच्याकडे केलेली आहे . त्यानंतर सदरची समायोजन प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली व त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळाला. त्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी आज शुभांगी ताई पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन आभार मानत त्यांचा सत्कार केला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा