डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ... - दैनिक शिवस्वराज्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ
डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या गोलंदाजीवर डॉ. उल्हास पाटील यांनी टोलविला चेंडू
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील 32 संघ सहभागी झाले आहेत.
या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads