जामनेर शहरात उष्माघाताचा कहर !एकाच दिवशी नऊ जणांचा बळी! स्मशानभूमीत जागा अपूर्ण.
जामनेर शहरात व तालुक्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 46 -47 डिग्री पर्यंत तापमान गेल्याने उष्माघाताने कहर केला असून एकाच दिवशी शहरातील नऊ जणांचा बळी उष्माघाताने घेतल्याचे वृत्त असून तापमाना मुळे कोणाला अटॅक येऊन तर कुणी आजारी पडून मृत्यू पावले आहे . जामनेरच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाच डेड बॉडी जाळण्याची व्यवस्था असताना नऊ जणांची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न स्मशानभूमी व्यवस्थापका कडे निर्माण झाला होता .
इंदुबाई तापीराम पाटील वय 83 राहणार आनंदनगर जामनेर यांना उष्माघाताने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.
जगन्नाथ विश्वनाथ थेटे वय 54 राहणार बजरंगपुरा जामनेर यांचाही उष्माघाताने बळी घेतला. तर दिलीप भाऊ रामभाऊ येणे व 50 राहणार दत्त चैतन्य नगर, सखुबाई (पूर्ण नाव माहित नाही), रघुनाथ लोहार वय 70 राहणार जामनेर पुरा, साहेबराव तोताराम चौधरी राहणार कासोदा वय 84 हे आपल्या मुलीकडे गिरजा कॉलनी येथे पाहुणे म्हणून आले असताना उष्माघाताने त्यांचा बळी घेतला तर अतुल पाटील होली पॅलेस जामनेर वय 35 हा तरुण चक्कर येऊन पडल्याने त्याचा बळी गेला .असे शहरातील एकूण नऊ जण उष्माघाताचे बळी ठरले असून याआधी पंधरा दिवसांपूर्वी शेंगोळा येथील 27 वर्षीय तरुण सादिक अल्लाउद्दीन तडवी हा शेतातून घरी आल्यावर त्याचा मृत्यू झाला .तर 22 मे रोजी खादगाव चे माजी उपसरपंच प्रमोद चौधरी यांचा 22 मे रोजी दुपारी दीड वाजता शेतातून घरी आल्यावर उष्माघाताने त्यांचा बळी घेतला. उन्हाचा प्रचंड पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून शेतीच्या मशागतीची कामेही रखरखत्या उन्हामुळे थंडावली असून जनतेने गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा