जामनेर उपजिल्हा रुग्णालया बाहेर गाडीतच महिलेची प्रसूती - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर उपजिल्हा रुग्णालया बाहेर गाडीतच महिलेची प्रसूती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दिनांक 25/ 5 /2024 रोजी संध्याकाळी साडेसात वाजन्याच्या सुमारास अंजली विश्वनाथ जोगी या महिलेलां जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्रस्तुतीसाठी नेत असताना दवाखान्याच्या गेट जवळच गाडीत महिलेची प्रस्तुती झाली परिस्थिती गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यावर असलेले स्टॉप नर्स वैशाली सुतार (पालवे) यांनी गाडीतच महिलेची प्रस्तुती केली व पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून घेतले डॉक्टर व स्टॉप नर्स यांच्या प्रसंग अवधानाने महिला व बाळ दोघेही सुखरूप आहे विशेष म्हणजे सातव्या महिन्यातच प्रसूती होऊन देखील बाळाचे वजन व आईची प्रकृती उत्तम असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांनी माहिती दिली डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टॉप ने दाखवलेले समय सुचकतेने महिलेच्या नातेवाईकांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads