रावेर तालुक्यातील पुरी-गोलवाडे येथील वादळा मुळे केळी पिकाची नुकसानीची श्रीराम पाटील यांनी केली पाहणी...
रावेर तालुक्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असुन अगोदरच वाढते तापमान घसरलेले केळीचे दर यामुळे असमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकर्यासमोर या नैसर्गिक आपत्तीमुळे संकट निर्माण झाले आहे. श्री.श्रीरामदादा पाटील यांनी रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारात शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व प्रांताधिकारी, तहसीलदार,महावितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे तात्काळ प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याबाबत आणि विमा कंपन्यांना निर्देश देण्या बाबत चर्चा केली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, सुनील कोंडे, गणेश देवगिरीकर, देवानंद पाटील, राजेंद्र चौधरी, अजय पाटील, प्रदीप पाटील, किरण पाटील, सतीश पाटील,सुनील पाटील,सुधीर पाटील,हरी पाटील, रतीराम कोळी, विशाल पाटील, पंकज पाटील, संकेत पाटील वं शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा