मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने जळगाव शहरात मोफत जलसेवा ....
नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने जळगाव शहरात मोफत जलसेवा सुरु करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिकेने शहरामध्ये नेमून दिलेल्या ४५ ठिकाणी दिवसातून २ वेळा व एका दिवसात किमान २० हजार लिटर शुद्ध व थंड फिल्टर आरओ पाणी दुध संघातर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे. याची सुरुवात आजपासून करण्यात आली असून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव महापालिका, जी.एम.फाऊंडेशन व जिल्हा दुध उत्पादक संघाच्या सहकार्यातून जळगाव शहरातील घाणेकर पाणपोईचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख, मनपा आयुक्त पल्लवी भागवत, दुध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील तापमान प्रचंड वाढल्याने शहरात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी ठिकठिकाणी असणाऱ्या थंड पाणपोईचा निश्चितपणे उपयोग होईल. यासोबतच शहरातील मुक्या जनावरांसाठीदेखील उपलब्ध असणाऱ्या हौदात दुध संघातर्फे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती अरविंद देशमुख यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा