अखेर वादळामुळे दिशादर्शक होर्डींगवरील लोखंडी फलक तुटून पडले खाली.... - दैनिक शिवस्वराज्य

अखेर वादळामुळे दिशादर्शक होर्डींगवरील लोखंडी फलक तुटून पडले खाली....

खामगांव प्रतिनिधी 
खामगाव बायपास घाटपुरी चोपडेच्या मळ्याजवळील निरंकारी भवन समोरील हायवेवरील लोखंडी होर्डिंग्ज नटबोल्ट निघून पाच दिवस झाले लोंबकळत असून तरी तेथे वादळ वाऱ्यामुळे होर्डिंग पडून तेथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती. संबंधित यंत्रणेने तो दिशादर्शक फलक ताबडतोब दुरुस्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी केली होती.परंतु संबंधित प्रशासनाने दखल घेतली नसून अखेर आज  घाटपुरी बायपास चोपडे यांच्या मळ्याजवळ निरंकारी सत्संग भवन समोरील हायवेवरील लोखंडी होर्डिंग्ज  
आज झालेल्या वादळामुळे दिशादर्शक होर्डींगवरील लोखंडी फलक तुटून पडले खाली पडले.असून 
सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.पाच दिवस होऊन गेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावरीही कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. सदैवाने आज मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असणार होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads