अवकाळी पावसामुळे शेतीचे घरांचे नुकसान मंत्री गिरीष महाजन यांनी नुकसान झालेल्या शेताची केली पाहणी.... - दैनिक शिवस्वराज्य

अवकाळी पावसामुळे शेतीचे घरांचे नुकसान मंत्री गिरीष महाजन यांनी नुकसान झालेल्या शेताची केली पाहणी....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील देऊळगाव, तोरनाळा, पळासखेडा काकर, गोरनाळा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, राहत्या घरांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची आज प्रत्यक्ष मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. केळीच्या बागा अक्षरशः झोपल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची छते उडून गेली असून, घरांची पडझड झाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत, यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये, अशा सूचना मंत्री गिरीष महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads